
प्रतिनिधी | राजेश चौधरी, प्रदिप कुळकर्णी

उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ (SCGT) च्या ‘सावदा बनाना सिटी सॅटेलाइट चॅप्टर’ चा लाँचिंग आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा सावदा येथील कुलसुमबाई मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्याला सावदा आणि परिसरातील उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शानदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. अजित मराठे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव-सावदा येथील भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे उपस्थित होते. तसेच, SCGT चे COA व्ही. पी. कुलकर्णी आणि डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल पिंपळेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात सावदा बनाना सिटी चॅप्टरच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष ॲड. अमोल रामचंद्र चौधरी, सचिव गुणवंत नेमाडे, खजिनदार ऋषिकेश सुनील पाटील यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृत पदभार स्वीकारला.

यावेळी चॅप्टरच्या सर्व नवनियुक्त संस्थापक सदस्यांचेही अधिकृत इन्स्टॉलेशन करण्यात आले. यामध्ये शेखर कासार, टेकचंद सरोदे, सागर पाटील, संतोष निमगडे, प्रतीक होले, सागर कोष्टी, ओमप्रकाश महाजन, प्रफुल्ल पाटील, मंगेश महाजन, मिलन महाजन, हितेश सुपे, खिलचंद बोंडे, गौरव भंगाळे, दिनेश जावळे, तन्मय पाटील आणि सागर पाटील यांचा समावेश आहे
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अजित मराठे यांनी उद्योजकांना ‘१०० उद्योजक, १०० कोटींची उलाढाल’ या सॅटर्डे क्लबच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाची आठवण करून देत मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे भागवत भंगाळे यांनी स्थानिक उद्योजकांना व्यवसायातील प्रगतीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. अमोल पिंपळेकर यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून दिले, तर ५४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे व्ही. पी. कुलकर्णी यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
या चॅप्टरच्या उभारणीसाठी उत्तर विभाग विस्तार प्रमुख (नॉर्थ रीजन एक्सपॅन्शन हेड) राजेश चौधरी, जळगाव विभाग प्रमुख (अभियांत्रिकी) (जळगाव रीजन हेड इंजि.) अभिजीत पाटील आणि उप-प्रादेशिक प्रमुख (डेप्युटी रीजन हेड) डॉ. दीपक पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात जळगाव चॅप्टर १, जळगाव चॅप्टर २, जळगाव एमआयडीसी आणि भुसावळ चॅप्टरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मंचावरील मान्यवरांचा परिचय ऋषिकेश पाटील व गौरव भंगाळे यांनी केला. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात नवनिर्वाचित सचिव गुणवंत नेमाडे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर, सर्व उपस्थित उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खान्देश स्पेशल’ स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. या दिमाखदार सोहळ्यामुळे सावदा आणि परिसरातील व्यावसायिक वर्तुळात एकच नवचैतन्य निर्माण झाले आहे.



