सावद्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा उपक्रम‎

 

सावदा प्रतिनिधी | प्रदीप कुळकर्णी, राजेश चौधरी

 

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ठाकरे गट यांचे वतीने सावदा बस स्थानक परिसरात रावेरचे नूतन आगार व्यवस्थापक गोविंद पवार यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले.

 

वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचाही संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी आवळा, अर्जुन साल, उंबर, वड, पिंपळ, लिंब, कापूर असे विविध प्रकारचे ५० रुक्ष लावण्यात आली. याप्रसंगी रावेरचे नवीन आगार व्यवस्थापक गोविंद पवार यांची नियुक्ती बाबत शिवसेना ठाकरे गटातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

या उपक्रमामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, पर्यावरण संरक्षणास मदत होईल,” असा विश्वास रावेर आगार व्यवस्थापक गोविंद पवार यांनी व्यक्त केला. प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमास सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रण मधुकर चौधरी आणि सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रण सुधाकर पाटील त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका उपाध्यक्ष धनंजय (लाला) चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख शाम भामरे, शिवसेना ठाकरे गटाचे सावदा शहर प्रमुख भरत नेहेते, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव शरद भारंबे त्याचप्रमाणे सदस्य मिलिंद पाटील, नितीन महाजन, सुनील राणे, इमरान शेख, किशोर तायडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी किरण गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

या बातमीचे प्रायोजक आहे. 
सहप्रायोजक आहे.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!