सावदा येथील विविध धार्मिक ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली महानुभाव मठ आणि स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.

(विधान परिषद मतदारसंघाचे आमदार नंदकिशोर (नंदू) महाजन तसेच मुख्यमंत्री आरोग्य विभाग प्रमुख रामेश्वर नाईक यांचे स्वागत)

प्रतिनिधि – प्रदिप कुळकर्णी, राजेश चौधरी 

जीवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी गुरू हेच प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम करतात. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग गुरू दाखवतात. जीवनाच्या महासागरात आपली नौका भरकटू नये म्हणून ते मार्गदर्शन करतात. गुरू आपल्या शिष्यांना ज्ञानदान करून त्यांचे विचार प्रगल्भ व समृद्ध करतात, असे प्रतिपादन सावदा महानुभाव मठाचे विश्वस्त आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री यांनी केले. सावदा येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त सावदा येथील महानुभाव मठ श्रीकृष्ण (दत्त) मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. देशातील विविध राज्यातील काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तरभारत, लुधियाना, चंदीगड, हरियाणा संपूर्ण भारतातून तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास दिवसभरातून २५००० भाविकांनी भगवंताचे दर्शन घेतले. मंदिरात सकाळी देवपूजा वंदन करण्यासाठी महानुभाव पंथातील सर्व अनुयायी, साधूसंत, भिक्षुक, वासनिक यांनी उपस्थिती दिली. देवपूजेमध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्याशी संबंधित ८०० वर्षांपूर्वीचे प्रसाद वंदन, देवपूजा तसेच श्री चक्रधर स्वामींचे वस्त्र प्रसाद इत्यादी वस्तूंचा समावेश असतो. प्रसाद वंदन प्रसंगी मानेकर पिढीतील कुलवंदन नमस्कार करण्यासाठी ठेवण्यात आले होते. प्रसंगी नवनिर्वाचित जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे आमदार नंदकिशोर (नंदू) महाजन तसेच मुख्यमंत्री आरोग्य विभाग प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दर्शन घेवून महानुभाव पंथातील सर्व अनुयायी, साधूसंत यांचा शाल श्रीफळ येवून आशीर्वाद घेतला. मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले होते.

या गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी शहरातील तथा परिसरातील सर्व महानुभाव अनुयायांनी मंदिराचे विश्वस्त आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली यथोचित सहकार्य केले. येथील स्वामीनारायण मंदिरात सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त हजारोंच्या संख्येने राधाकृष्ण देव आणि हरिकृष्ण महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहण्यात मिळाली. दर्शनासाठी आलेल्या सर्व बाहेर गावच्या हरिभक्त्तांसाठी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास यांनी फराळाची व्यवस्था केली होती. शहरातील रावसाहेब प्रेमचंद नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वामींच्या मठामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत, त्यांच्या गुरूंची भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रात सकाळी आठ ते नऊ वाजे दरम्यान मंत्रोच्चारासह स्वामींच्या मूर्तीचा पुरोहित गजानन जोशी महाराज यांच्या पौरोहित्य खाली कपिल पाटील तथा प्राजक्ता पाटील या दांपत्याने अभिषेक केला. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचे पारायण झाले. त्यानंतर महाआरती होऊन दुपारी बारानंतर महाप्रसाद वाटप करण्यात

आला. केंद्रात महिला भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी पहावयास मिळाली. या दिवशी शिष्यांनी आपल्या गुरूंचे पूजन करून आशीर्वाद घेतले. महर्षी व्यास जयंतीनिमित्त या सणाला विशेष महत्त्व असते. शहरात सर्वत्र गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळाले. शहरातील मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भजन, कीर्तन आणि प्रवचनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!